Saturday, March 8, 2025

 वृत्त क्रमांक 272

जिल्हा रुग्णालयात महिला दिनानिमित्ताने जनजागृतीपर कार्यकम

नांदेड, दि. ८ मार्च :- आज जागतिक महिला दिनानिमित्त श्री गुरुगोविंद सिंगजी स्मारक जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ८ मार्च जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज अवयव दान जनजागृती व जागतिक श्रवण दिन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अवयवदान कसे केले जाते याबद्दलची पूर्ण प्रक्रिया डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाच्या बधिरीकरण विभाग प्रमुख डॉक्टर वैष्णवी कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. 

तसेच जागतिक श्रवण दिनाबद्दल श्रवणदोष का येते व काळजी काय घ्यायची याबद्दलची मार्गदर्शन डॉ. अश्विन लव्हेकर कान नाक घसा तज्ञ यांनी केले.

या कार्यक्रमासाठी जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पेरके ,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.हनुमंत पाटील डॉ. साखरे, डॉ. पुष्पा गायकवाड तसेच मेट्रन श्रीमती राठोड सर्व विभागाच्या इन्चार्ज सिस्टर, परिचर्या प्रशिक्षण केंद्र रुग्णालय नांदेड येथील प्राचार्य श्रीमती बोथीकर व सर्व शिक्षक व प्रशिक्षणार्थी यांची उपस्थिती होती. त्याचबरोबर जिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी कर्मचारी व महिला सफाई कर्मचारी हे सर्व उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शितल उदगीरकर व ज्योती पिंपळे यांनी केले. 

महिला दिनानिमित्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी मनोगत व्यक्त  करून उपस्थित महिलांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. श्रीमती हळदेकर व श्रीमती विद्या बापते यांनी महिला दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले.

०००००





No comments:

Post a Comment

बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील आमदार बाबुराव पाटील कोहळीकर, आनंद पाटील बोंढारकर यांनी यावेळी भाविकांना शुभेच्छ...