Saturday, March 8, 2025

वृत्त क्रमांक 271

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतील

लाभार्थ्यांची रेल्वे नांदेड येथून रवाना 

•   पालकमंत्र्यांची ऑनलाईन उपस्थिती 

•  लोकप्रतिनिधींनी दिल्या भाविकांना शुभेच्छा  

नांदेड दि. 8 मार्च  :- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत नांदेड येथून अध्योध्या धाम येथे जाण्यासाठी पहिली रेल्वे  शनिवार 8 मार्चला सकाळी 11 वा. आठशे भाविकांना घेऊन रवाना झाली आहे. या रेल्वेला लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत व ज्येष्ठ नागरिकांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत आज रवाना करण्यात आले. 

या रेल्वेला राज्याचे  इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री अतुल सावे, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी ऑनलाईन शुभेच्छा दिल्या. तर रेल्वे स्थानकावर बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष आमदार हेमंत पाटील, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार आनंद पाटील बोंढारकर, आमदार बाबुराव पाटील कोहळीकर, समाज कल्याणचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांची उपस्थिती होती.  

राज्यातील नागरिकांना देशातील मोठया तीर्थ स्थळांना जावून, मनशांती तसेच आध्यामिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी राज्यातील सर्व धर्मातील जेष्ठ नागरिक, जे 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत. त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थ क्षेत्राना मोफत दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 14 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये कार्यान्वीत झाली आहे.  

आज हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर सकाळपासून आयोध्याला जाणाऱ्या प्रवाशांची लगबग होती. सर्व प्रवाशांना समाज कल्याण विभागामार्फत ओळखपत्र देण्यात आले. तसेच त्यांच्या बसण्याच्या ठिकाणासह त्यावर बोगी नंबर लिहिला होता. सर्व ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे त्यांच्या पूर्ण प्रवाशात त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक वैद्यकिय टिमसोबत आहे. तसेच सोबत 15 कर्मचारी असणार आहेत. आज रेल्वेस्थानकावर शिवानंद मिनगिरे यांच्या मार्गदर्शनात छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजनाला बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष आमदार हेमंत पाटील, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार आनंद पाटील बोंढारकर, आमदार बाबुराव पाटील कोहळीकर यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांच्या कुटुंबियांची उपस्थिती होती. 

00000















No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक  441 उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचा दौरा  नांदेड दि. 27 एप्रिल :- राज्याचे उद्योग, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उप...