Monday, March 3, 2025

दि. 2 मार्च 2025

वृत्त क्रमांक 249

एस.एम.पटेल यांना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची श्रद्धांजली 

नांदेड दि. २ मार्च :  श्री. सय्यद महमद हुसेन सय्यद मदार पटेल (एस.एम.पटेल), कबडडी, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी हे दि. 01 मार्च,2025 रोजी अनंतात विलीन झाले. त्यांच्या निधनाप्रती शोक व्यक्त करताना राहुल कर्डिले यांनी क्रीडा क्षेत्रातील मार्गदर्शक हरवल्याची श्रद्धांजली अर्पण केली आहे.

आज खऱ्या अर्थाने नांदेड कबड्डीचा श्वास थांबला. एस. एम. पटेल सर यांच्या रूपाने नांदेड मध्ये कबड्डीचे वृक्ष फुललेलं होत. त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली ती कधीच भरून निघणार नाही. त्यांच्या परिवाराला या दुःखातून सांभाळण्याची शक्ती ईश्वर देवो, ही प्रार्थना, अशा शब्दात त्यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.

मागील महिन्यात नांदेड येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेत कबडडी या खेळाचे आयोजन-नियोजन एस. एम. पटेल सर यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाले. त्यांच्या उल्लेखनीय मार्गदर्शनामुळे सदरच्या स्पर्धा यशस्वी झाल्या असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनीही शोक व्यक्त केला आहे.त्यांच्या शोक संदेशात कबड्डी क्षेत्रामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे रोखठोक भूमिकेने आपले स्थान उमटणारे नांदेड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे माजी सचिव, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अनेक जणांचे प्रेरणास्थान आदरणीय एस. एम. पटेल सर काळाच्या पर्दा आड गेल्याची बातमी धक्कादायक आहे.पटेल सरांचे कार्य कबड्डी क्षेत्र आपले धोरण म्हणून नेहमी आठवण ठेवेल असे म्हटले आहे.

एस. एम. पाटेल सर यांनी कबडडी या खेळात उल्लेखनीय कार्य केल्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव व सन्मान व्हावा याकरीता महाराष्ट्र शासनाने सन 2008-09 या वर्षात त्यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार (संघटक/ कार्यकर्ता) म्हणुन देवून त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

एस. एम. पाटेल सर हे एकविध खेळ संघटनेमध्ये राज्यस्तरावर संघ व्यवस्थापक, शासकीय सदस्य, कार्यकारी मंडळ सदस्य, संचालन समिती अधिक्षक, निवड समिती सदस्य, राष्ट्रीय कबडडी पंच सदस्य, कबडडी पंच मंडळ अधिक्षक, निवड समिती, वेळ अधिकारी, तांत्रीक अधिकारी राज्य, विभाग, जिल्हा पंच म्हणून उल्लेखनिय कार्य केले आहे. तसेच क्रीडा प्रचार व प्रसार यामध्ये पुस्तक प्रकाशन, क्रीडा लेख लिहीलेले आहेत. महाराष्ट्र राज्याचे नांव देशात व आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावण्यास संस्मरणीय अशी विशेष कार्य केले असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.जयकुमार टेंभरे यांनी कळविले आहे.

0000



No comments:

Post a Comment

  ‘जीडीसीए’ परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली अकोला, दि. ३ : जी. डी. सी. अँड ए आणि सीएचएम परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दि. ७ मा...