Tuesday, February 18, 2025

 वृत्त क्रमांक 195

नांदेड शहरातील शुक्रवार ते रविवार पर्यंतचे आठवडी बाजार राहणार बंद 

सोमवार 24 फेब्रुवारी रोजी भरतील हे बाजार  

नांदेड दि. 18 फेब्रुवारी : राज्यस्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा येत्या 21, 22 व 23 फेब्रुवारी रोजी नांदेड शहरात पार पडणार आहेत. त्याअनुषंगाने नांदेड शहरात शुक्रवार 21, शनिवार 22, रविवार 23 फेब्रुवारी रोजी भरणारे आठवडी बाजार बंद राहणार आहेत. हे आठवडी बाजार सोमवार 24 फेब्रुवारी रोजी भरणार आहेत. याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज आदेश निर्गमीत केला आहे. 

या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी राज्यातून जवळपास 3 हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती राहणार आहेत. श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडियम तसेच यशवंत कॉलेज मैदान या परिसरात या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेच्या ठिकाणच्या मार्गात अडथळा निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सार्वजनीक शांतता भंग होऊ नये यासाठी मार्केट अँड फेअर अॅक्ट 1862 चे कलम 5 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन  जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी हा आदेश काढला आहे.

0000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.  77 9 मराठी भाषेकडून राष्ट्राच्या सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राजधानीत अखिल भारतीय मराठी साहित्य ...