वृत्त क्र. 80
दहावी-बारावी परीक्षेचे प्रवेशपत्र नव्याने ऑनलाईन उपलब्ध
नांदेड दि. 21 जानेवारी : फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावी परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉलतिकीट) नव्याने 23 जानेवारी पासून तर इयत्ता दहावी परीक्षेचे प्रवेशपत्र 20 जानेवारीपासून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळेचे प्राचार्य-शिक्षक, विद्यार्थी, पालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन शिक्षण मंडळाचे सचिन देविदास कुलाळ यांनी केले आहे.
मंडळाने उपलब्ध करून दिलेल्या इयत्ता 12 वी प्रवेश पत्रांवर (हॉलतिकीट) जातीचा प्रवर्ग या कॉलमची
छपाई करण्यात आली होती. याबाबत लोकभावनेचा आदर करून मंडळाने दिलगिरी व्यक्त केली
आहे. प्रवेशपत्रांवरील (हॉल तिकीट) सदरचा जातीचा प्रवर्ग कॉलम रद्द केला असून विद्यार्थ्यांची
परीक्षेविषयक इतर माहिती आहे तशीच राहणार आहे. नव्याने तयार केलेली प्रवेशपत्रे (हॉलतिकीट)
गुरूवार 23 जानेवारी पासून ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in
यासंकेतस्थळावर Admit Card या लिंकद्वारे डाऊनलोड
करता येणार आहेत.
तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2025 साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावरील (हॉल तिकीट) जातीचा प्रवर्ग हा कॉलम रद्द करण्यात आला आहे. ही प्रवेशपत्र (हॉल तिकीट) ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर सोमवार 20 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेपासून Admit Card या लिंकद्वारे डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
डाऊनलोड संदर्भातील उर्वरित इतर सूचना व विद्यार्थ्यांची परीक्षाविषयक माहिती आहे तशीच कायम राहील. यात कोणताही बदल होणार नाही याची सर्व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, विद्यार्थी-पालकांनी नोंद घ्यावी, असेही आवाहन शिक्षण मंडळाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
00000
No comments:
Post a Comment