वृत्त क्र. 84
पंडित दिनदयाल उपाध्याय
रोजगार मेळाव्यात 50 उमेदवारांची अंतिम निवड
नांदेड दि. 21 जानेवारी : रोजगार इच्छुक युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत बाबानगर नांदेड येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन आज करण्यात आले होते. यामेळाव्यात 8 कंपन्यांनी 931 रिक्त पदांसाठी आपला सहभाग नोंदविला होता. मेळाव्यात 148 उमेदवार उपस्थित होते यात 152 उमेदवारांची प्राथमिक तर 50 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली.
हा मेळावा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या उपायुक्त श्रीमती विद्या शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी गणवीर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या रोजगार मेळाव्यात 8 कंपन्यांनी आपला सहभाग नोंदविला होता. शासन आपल्या दारी याप्रमाणे कंपन्या आपल्या दारी असे सूत्र अंगीकारुन जास्तीत जास्त रोजगार इच्छुक उमेदवारांना रोजगार प्राप्त करुन देण्याचे आवाहन उपायुक्त श्रीमती शितोळे यांनी केले. प्रस्ताविकात कौशल्य विकास विभागाच्या योजनांची तसेच ईस्राईलमध्ये असलेल्या रोजगाराबाबतच्या संधीचा लाभ युवकांनी घ्यावा, असे आवाहन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी केले. मेळाव्याच्या सुरूवातीला दिप प्रज्वलन करून सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
000
No comments:
Post a Comment