वृत्त क्रमांक 21
माळेगाव यात्रेत आज कुस्त्यांची दंगल
विविध स्पर्धेतील बक्षीस वितरण
नांदेड, 4 जानेवारी- माळेगाव यात्रेत जिल्हा परिषदेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आज रविवार दिनांक 5 जानेवारी रोजी यात्रेत कुस्त्यांची भव्य दंगल आयोजित करण्यात आली आहे.
दुपारी 12 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार असून आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांची विशेष उपस्थिती असेल. आ. बाबुराव कदम कोहळीकर, आ. भीमराव केराम, लोहा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी दशरथ आडेराघो यांची उपस्थिती राहणार आहे.
महाराष्ट्र केसरीच्या धर्तीवर माळेगाव यात्रेत विजेत्या मल्लास माळेगाव केसरी हा सन्मान प्रदान केला जातो. नांदेडसह विविध राज्यांतून कुस्तीपटू मोठ्या संख्येने या स्पर्धेत भाग घेणार आहेत. माळेगावच्या लाल मातीत कुस्त्या रंगणार असून या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पशु प्रदर्शन व दुग्ध स्पर्धा बक्षीस वितरण
माळेगाव यात्रेनिमित्त पशु प्रदर्शन, दुग्ध स्पर्धेा, कृषी तसेच स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना आज माळेगाव यात्रेत बक्षीस वितरण केले जाणार आहे.
आज सकाळी 11 वाजता होणाऱ्या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. यावेळी बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. आ. डॉ. तुषार राठोड, आ. बालाजीराव कल्याणकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
बक्षीस वितरण सोहळ्यानंतर माळेगाव यात्रेचा समारोप होईल. जिल्हा परिषदेच्या वतीने आज होणाऱ्या दोन्ही कार्यक्रमात यात्रेकरूंनी नागरिकांनी व स्पर्धकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
00000
No comments:
Post a Comment