Friday, January 3, 2025

वृत्त क्रमांक 15

सततच्या वाचनाने यश निश्चितच प्राप्त होते : अप्पर पोलीस अधिक्षक सुरज गुरव

नांदेड दि. 3 जानेवारी :-  वाचन संकल्प महाराष्ट्राचा या अभियानातंर्गत आज अप्पर पोलिस अधिक्षक सुरज गुरव यांच्या हस्ते विविध विषयावरील ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन जिल्हा ग्रंथालयात करण्यात आले. यावेळी ग्रंथालयातील विविध विषयावरील ग्रंथाचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. स्पर्धा परिक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक यांनी सतत वाचन करावे. त्यामुळे निश्चित यश प्राप्त होते असे प्रतिपादन अप्पर पोलिस अधिक्षक सुरज गुरव यांनी केले.

यावेळी भारताच्या स्त्री शिक्षणाच्या गंगोत्री तसेच ज्ञानज्योती, क्रांती ज्योती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई यांचे प्रतिमेचे तसेच ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा या अभियानांतर्गत स्पर्धा परिक्षेची तयारी करणारे विद्यार्थी ,विदयार्थीनी ,अभ्यासक उपस्थित होते. या कार्यक्रमात जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सुर्यवंशी, ग्रंथालय निरीक्षक कै.सं.गायकवाड, अजय वटटमवार, मुंजाजी घोरपडे, महानगरपालिकेचे ग्रंथपाल श्रीनिवास इज्जपवार, बाळू पावडे आदीचा सहभाग होता.

00000





No comments:

Post a Comment

  ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ लोकशाही प्रक्रीयेत सहभागासाठी जास्तीत जास्त पदवीधर मतदारांनी नाव नोंदणी करावी - विभागीय आयुक्त जितेंद्र...