Friday, December 13, 2024

 कृपया सुधारित वृत्त क्र. 1193 

जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा

नियोजित कामे संबंधित यंत्रणांनी तातडीने पुर्ण करावे

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

नांदेडदि. 13 डिसेंबर :-  जिल्हा वार्षिक योजनेचा मंजूर निधी विविध विकास कामांवर खर्च करुन नियोजित कामे संबंधित यंत्रणानी तात्काळ पुर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी  दिले.

 

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपयोजनेची आढावा बैठक जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिपकुमार माळोदेसमाज कल्याणचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे यांच्यासह संबंधित विभागाच्या विभागप्रमुखाची उपस्थित होती.

 

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले कीसंबंधित यंत्रणानी तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही तात्काळ पूर्ण करुन विकास कामे सुरु करावीत. सदरची मंजूर कामे तातडीने देऊन पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सन 2025-26 चा आराखडा प्रारुप आराखडा आयपास प्रणालीवर भरुन सादर करण्याच्या सूचना केल्या. मंजूर संपूर्ण निधीचा विनीयोग करुन निधी परत जाता कामा नयेयाची खबरदारी घ्यावी. तसेच मागील वर्षीची प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले.

00000








No comments:

Post a Comment

जिल्ह्यात वंधत्व व उशिरा गर्भधारणा समस्येवर 'फर्टिलिटी ओपीडी ' सुरू नागरिकांनी आरोग्य यंत्रणेच्या सुविधेचा लाभ घ्यावा

 जिल्ह्यात वंधत्व व उशिरा गर्भधारणा समस्येवर 'फर्टिलिटी ओपीडी ' सुरू   नागरिकांनी आरोग्य यंत्रणेच्या सुविधेचा लाभ घ्यावा  नांदेड दि....