Friday, December 13, 2024

 वृत्त क्र. 1194

 महाराष्ट्र राज्य दिव्यांगत्व संशोधन समितीत

अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीसाठी माहिती सादर करण्याचे आवाहन

 

नांदेड दि. 13 डिसेंबर :- महाराष्ट्र राज्य दिव्यांगत्व संशोधन समितीसाठी अशासकीय सदस्यांची नावे शिफारशीसह सादर करण्यात येणार आहेत. दिव्यांग क्षेत्रात कार्यरत नामवंत व तज्ज्ञ व्यक्तीदिव्यांग व्यक्तीदिव्यांग व्यक्ती व दिव्यांगांच्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधीत्व करणारे दिव्यांग पदाधिकारी व सदस्य यांनी समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद नांदेड या कार्यालयात सोमवार 16 डिसेंबर 2024 पर्यंत पोष्टाने किंवा समक्ष उपस्थित राहुन माहिती सादर करावीअसे आवाहन  जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी केले आहे.

 

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 उपकलम 2 (2) व महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार अ दिनांक 5 सप्टेंबर 2024 मधील प्रकरणे 2 (3) मध्ये (ग) अन्वये महाराष्ट्र राज्य दिव्यांगत्व संशोधन समितीवर नियुक्तीसाठी अशासकीय सदस्य म्हणून राज्य शासनाने दिव्यांग व्यक्तीमधून सदस्य म्हणून नामनिर्देशित केलेल्या 7 व्यक्ती किंवा अधिनियमाच्या कलम 2 च्या कलम (झेड) अंतर्गत परिभाषित केल्यानुसार नोंदणीकृत संस्थेचे प्रतिनिधित्व करणारे सदस्य म्हणून समावेश केलेला आहे. त्यानुसार सदर समितीमध्ये अशासकीय सदस्यांची राज्य शासनामार्फत नियुक्ती होणे आवश्यक आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य दिव्यांगत्व संशोधन समिती करीता अशासकीय सदस्य म्हणून नावे पुढीलप्रमाणे विहित तक्त्यात सादर करावेतअसे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी

 

नामनिर्देशित बाब : राज्य शासनाने दिव्यांग व्यक्ती मधून सदस्य म्हणून नामनिर्देशित केलेल्या सात व्यक्ती किंवा अधिनियमाच्या कलम 2 च्या कलम (झेड) अंतर्गत परिभाषित केल्यानुसार नोंदणीकृत संस्थाचे प्रतिनिधीत्व करणारे सदस्य. सदस्य संख्या : 7, शिफारस केलेल्या नामनिर्देशित सदस्यांचे नावपत्तासंपर्काचा क्रमांक व ईमेल. शिफारस केलेल्या नामनिर्देशित सदस्यांची संपूर्ण वैयक्तिक माहितीशिफारस केलेल्या नामनिर्देशित सदस्यांच्या उल्लेखनीय कार्य केल्याची कामगिरी ही माहिती सादर करावीअसेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्र. 68 नांदेड जिल्ह्यातील 67 रेती घाटांची जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष पर्यावरणीय जन सुनावणी  स्थानिक रोजगाराला प्राधान्य देण्याचा स...