वृत्त क्र. 1166
समाज कल्याण कार्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन
नांदेड, ७ डिसेंबर:- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात सकाळी ११ वाजता श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव ता.जि. नांदेड येथील भन्ते, कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्याच्या उपस्थितीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच समाज कल्याण कार्यालयाच्या अधिनिस्त असलेले सर्व शासकीय वसतिगृह व शासकीय निवासी शाळा येथे महामानवास विनम्र अभिवादनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव ता.जी.नांदेड येथील भन्ते श्रद्धानंद, भन्ते शील धम्मा,भन्ते सुयश,भन्ते सुनंद, भन्ते सारीपुत उपस्थित होते.सर्व मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.त्यानंतर उपस्थित भन्ते यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिशरण,पंचशील गाथा व भीमस्मरण सामुहिकरित्या घेण्यात आले.तदनंतर भन्ते श्रद्धानंद यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्याना मार्गदर्शन केले त्यानंतर सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी अभिवादनपर मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय नांदेड, जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालय नांदेड, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय नांदेड व सामाजिक न्याय भवनातील सर्व महामंडळे येथील कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००००
No comments:
Post a Comment