· जागतिक मृदा दिन पोखर्णी येथे संपन्न
नांदेड दि. 10 डिसेंबर : जमिनीतील रासायनिक खतांचा होणारा अतिवापर टाळून जमिनीमध्ये जैविक सूक्ष्म जीवाचा अधिवास वाढणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डी. आर. कळसाईत यांनी केले.
जागतिक मृदा दिनानिमित्त जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी कार्यालय व कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी येथे मृदा दिन कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच 5 डिसेंबर रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डी. आर. कळसाईत तर प्रमुख मार्गदशक म्हणून तालुका कृषी अधिकारी चातरमल, कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख, डॉ. महेश अंभोरे, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी प्रकाश पल्लेवाड यांची उपस्थिती होती.
जैविक संघ ट्रायकोडर्मा, मेटज्ञराझियम, निं
डॉ. देविकांत देशमुख यांनी शेतकऱ्यांना आपल्या प्रमुख मार्गदर्शनातुन मृदेचे मानवाच्या जीवनातील अनन्य साधारण महत्त्व विशद करुन शेतकऱ्यांनी रासायनिक खते व औषधे यांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा वापर करावा. मृदेचे आरोग्य व जैवविविधता जोपासावे असे सांगितले. कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी येथील शास्त्रज्ञ प्रा. संदीप जायभाये यांनी शेतकऱ्यांनी मृदा परीक्षण अहवालाप्रमाणे पिकांना खतांच्या मात्रा द्याव्यात तसेच मृदेचा सामु, सेंद्रिय कर्ब यांची माहिती सोप्या भाषेत सांगितली. तसेच मृदा चाचणीतुन शेतीमध्ये सकारात्मक बदल होत असल्याचे मत व्यक्त केले. प्रा. पवळे मॅडम यांनी मृदेचे आरोग्य चांगले राहण्यासाठी मृद परीक्षण करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले व त्याचे महत्त्व सांगितले.
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कळसाईत यांच्या हस्ते गावातील शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात आले. तसेच कृषि विज्ञान केंद्र येथील प्रशिक्षित घेतलेल्या प्रशिक्षणार्थी यांचा प्रमाणपत्र सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. महेश अंभोरे यांनी केले तर जि.मृ.स.मृ चा अधिकारी पी. पी. पल्लेवाड यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी प्रकाश पल्लेवाड कार्यालयातील कृषी पर्यवेक्षीका जे.सी. शिंदे, कृषि सहाय्यक एस.एस. सोनवणे, गुप्ता मॅडम, दत्तत्रय चिंतावार, गजानन पडलवार, राहुल जाधव, जावेद शेख, मोहन बेरजे, सुनील कराळे, एम.ए. पठाण आदींनी परिश्रम घेतले.
00000
No comments:
Post a Comment