वृत्त क्र. 1159
जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचे उदघाटन
नांदेड दि. 4 डिसेंबर : - जिल्हा रुग्णालयात बुधवार ४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम दिन राबविण्यात आला. या मोहिमेचे उदघाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस.एम पेरके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. आर.एस बुट्टे, डॉ. एच.के. साखरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पुष्पा गायकवाड यांची उपस्थिती होती. या मोहिमेच्या माध्यमांतून जंताच्या प्रादुर्भावामुळे आरोग्यावर काय परिणाम होतात याविषयी सर्व मान्यवर अधिकारी व श्रीमती डी.ए. गुंडाळे, आर.के.एस.समुपदेशक व समन्वयक यांनी माहिती दिली . कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड यांनी केले.
1 ते 2 वर्षातील बालकांना अर्धी गोळी व 2 ते 19 वर्षे वयोगटातील बालकांना जंतनाशक गोळी खाऊ घालण्यात आली. आज गैरहजर असलेल्या बालकांना 10 डिसेंबर 2024 रोजी मॉप अप दिनी जंतनाशक गोळया देण्यात येणार आहे. तरी सर्व बालकांनी जंतनाशक गोळी खावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
०००००
No comments:
Post a Comment