Friday, August 23, 2024

वृत्त क्र. 761

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता देऊन

केंद्रीय कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे केले स्वागत

नांदेड दि. 23  ऑगस्ट :- केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण, ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे परळी वैजनाथ या ठिकाणच्या कृषी महोत्सवासाठी 21 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता नांदेडच्या गुरुगोविंद सिंगजी विमानतळावर दिल्ली येथून आगमन झाले होते. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता देऊन मंत्री महोदयांचे स्वागत केले. स्वागतानंतर ही ग्रामगिता मी वाचणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...