Friday, August 23, 2024

 वृत्त क्र. 764

स्थायी लोकअदालतीची निर्मिती  

नांदेड दि. 23  ऑगस्ट :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या अधिपत्याखाली स्थायी लोक अदालतींची मुंबई, नागपुर, छत्रपती संभाजीनगर व पुणे येथे स्थापना करण्यात आली आहे. तेथे विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 चे कलम 22-अ मध्ये विषद केलेल्या लोकोपयोगी सेवा जसे विद्युत, पाणी, गॅस इत्यादी संबंधी प्रकरणे तडजोडी करीता ठेवता येतात. या स्थायी लोक अदालतीत मोठया संख्येने प्रकरणे तडजोडीसाठी ठेवावीत. संबंधीतांनी वरील ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या स्थायी लोक अदालती समक्ष आपली प्रकरणे ठेवून ती तडजोडीद्वारे मिटवून  घेवून लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्रीमती सुरेखा कोसमकर व जिल्हाविधी  सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती दलजीत कौर जज यांनी केले आहे.  

0000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...