Tuesday, August 13, 2024

वृत्त क्र. 711

इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी खासगी

विद्यार्थ्यांना  नावनोंदणी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सुविधा

·         विद्यार्थ्यांनी संधीचा लाभ घेण्याचे आवाहन

 

नांदेड दि. 13 ऑगस्ट :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2025 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरित्या (फॉर्म नं. 17 भरून) प्रविष्ट होण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे. 

 

इयत्ता दहावी व बारावी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थ्यांसाठी सर्व शाळा/कनिष्ठ महाविद्यालये मंडळाच्या अटी शर्तीनुसार नाव नोंदणी करण्यासाठी उपलब्ध आहेत. यासंदर्भातील सर्व माहिती व मार्गदर्शक पुस्तिका मंडळाच्या http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सर्व विद्यार्थी, शाळा, कनिष्ठ महाविद्यालयानी आपल्या कार्यकक्षेतील विभागीय मंडळाशी संपर्क साधावा असेही कळविले आहे.  

 

विद्यार्थ्यांना खासगीरित्या (फॉर्म नं. 17 भरून) ऑनलाईन अर्ज स्विकारण्याच्या तारखा पुढीलप्रमाणे आहेत.  विद्यार्थ्यांनी 13 ऑगस्टपासून ते 30 सप्टेंबर 2024 पर्यत नावनोंदणी अर्ज आणि शुल्क ऑनलाईन भरुन अर्जाची प्रत ऑनलाईन शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीचे प्रिंटआऊट व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या शाळेत, कनिष्ठ महाविद्यालयात जमा करणे.  तर 1 ऑक्टोंबर ते 30 ऑक्टोंबर 2024 या कालावधीत विद्यार्थ्यांनी विलंब शुल्काने नावनोंदणी अर्ज व शुल्क  ऑनलाईन भरून अर्जाची प्रत नावनोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीच्या प्रिंटआऊट व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेत/ कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जमा करता येतील. खाजगी विद्यार्थ्यांनी इयत्ता 10 वी व 12 वी साठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच भरावेत. त्यामुळे कोणतेही ऑफलाईन अर्ज स्विकारले जाणार नाहीत यांची नोंद घ्यावी, असेही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविली आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...