वृत्त क्रमांक 157
बारावी-दहावी परीक्षेसाठी
राज्य मंडळ स्तरावर समुपदेशक नियुक्त
नांदेड (जिमाका) दि. 21 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेसाठी राज्यमंडळ स्तरावर समुपदेशक नियुक्ती करण्यात आले आहे.
परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन करण्याकरीता राज्यमंडळ स्तरावरुन समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.
भ्रमणध्वनी 7387400970, 9011184242, 8421150528, 8263876896, 8369021944, 8828426722, 9881418236, 9359978315, 7387647902, 9011302997 या क्रमांकावर समुपदेशक परीक्षा कालावधीत सकाळी 8 ते रात्री 8 या कालावधीतच विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे नि:शुल्क आवश्यक ते समुपदेशन करतील. मात्र विद्यार्थी, पालक यांनी परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था व प्रश्नपत्रिकेसंबधित प्रश्न इत्यादींबाबत समुपदेशकांना विचारणा करू नये याची नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षा दि. 21 फेब्रुवारी ते दि. 19 मार्च 2024 तसेच माहिती तंत्रज्ञान (आय.टी.) व सामान्य ज्ञान (जी.के.) या विषयाची ऑनलाईन परीक्षा दिनांक 20 ते 23 मार्च 2024 व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी ) परीक्षा दि. 1 ते 26 मार्च 2024 या कालावधीत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अ
00000
No comments:
Post a Comment