Wednesday, February 21, 2024

 वृत्त क्रमांक 156 

आज पासून क्रीडा शिक्षक प्रशिक्षण शिबिराची सुरुवात

 

·  जिल्हास्तर क्रीडा शिक्षक प्रशिक्षण शिबीरात सहभागी होण्याची संधी

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तर क्रीडा शिक्षक प्रशिक्षण शिबीर सन 2022-23 चे आयोजन दिनांक 22 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुलश्री गुरुगोबिंदसिंघजी स्टेडीयम परीसर नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात सहभागी व्हावे, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्य. व प्राथमिक)व जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

 

या प्रशिक्षण शिबीराचा मुख्य हेतू राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धनप्रचारप्रसार व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण असणे आवश्यक आहे. याच भुमिकेतुन राज्याचे क्रीडा धोरण 2012 घोषित करण्यात आले आहे. या क्रीडा धोरणातील मुद्या क्र. 6 (5) नुसार खेळामधील बदललेले आधुनिक तंत्रज्ञानप्रशिक्षणाच्या पद्धतीनविन खेळांची शास्त्रोत माहिती वेळोवेळी क्रीडा शिक्षक, शारीरिक शिक्षकांना होणे आवश्यक आहे.

 

त्यासाठी क्रीडा शिक्षकांना क्रीडा मानसशास्त्र, क्रीडा शरीर रचना शास्त्र, क्रीडा वैद्यक शास्त्रक्रीडा संघटन व व्यवस्थापनक्रीडा व्यायाम व आहार, व्यायामाचे शरीर क्रिया शास्त्र व आवश्यक विषयांची माहिती होऊन खेळाडूंना खेळाविषयी पोषक वातावरण तयार करुन देण्यात येणार आहे. याकरीता नांदेड जिल्ह्यातील प्रती तालुक्यातील 5 क्रीडा शिक्षक / शारीरिक शिक्षक यांना बोलविण्यात ये आहे. सदर प्रशिक्षण शिबीर हे निवासी असुन यामध्ये भोजन व निवासाची सोय शासनामार्फत करण्यात आली आहे.

00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...