Wednesday, September 13, 2023

 जिल्ह्यात कोणीही अनधिकृत वजन काटे वापरु नयेत

 वैधमापन शास्त्र विभागाचे आवाहन  

 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- शेजारच्या राज्यातून वजन काट्याचे सुट्टे भाग व वजन काटे कमी दरात व कररहीत स्वरुपात महाराष्ट्रात विकले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे स्थानिक वजन काटे उत्पादक, दुरुस्तक व विक्रेते यांचे नुकसान होवून राज्य शासनाचा महसूल बुडत आहे. या अनुषंगाने राज्याचे वैधमापन शास्त्र नियंत्रक यांच्याकडे तक्रार प्राप्त झाली आहे. चीनमधून येणाऱ्या अप्रमाणित वजन काट्यांची सुध्दा कमी दरात खुल्या बाजारात विक्री होत आहे. या अप्रमाणित वजन काट्यांमुळे ग्राहकांच्या हिताची हानी होत आहे. यामुळे जिल्ह्यात कोणीही असे अनधिकृत वजन काटे वापरु नयेत, असे आवाहन जिल्ह्याचे वैधमापन शास्त्र विभागाचे उप नियंत्रक सं.मु.बिल्पे यांनी केले आहे.

चीनमधून येणाऱ्या अप्रमाणित वजन काट्यांना राज्य शासनाची व केंद्र शासनाची वैधानिक मान्यता नाही. अशा वजन काट्यांना अनाधिकृत व्यक्ती त्यांचे स्टिकर लावून त्याची अनाधिकृत विक्री करीत आहे. यामुळे ग्राहकांना माल योग्य वजनात मिळू शकत नाही. महाराष्ट्र शासनाचे महसुलावर परिणाम होत आहे. यामुळे अशा प्रकारच्या अनाधिकृत व्यक्तीकडून वजन काटे खरेदी करू नयेत, असेही वैधमापन शास्त्र विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1145   सत्यापनकर्ता (व्हेरीफायर) लॉगिन मधून पीक पाहणी दुरुस्ती ची  कार्यपद्धत   नांदेड दि.  27   नोव्हेंबर :   संपूर्ण राज्या...