प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील प्रलंबित लाभार्थांनी
ई केवायसी व आधार प्रमाणीकरण करून घ्यावे - जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी
नांदेड (जिमाका) दि. 13 :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत १५ व्या हप्त्याच्या वितरणाचे नियोजन सुरु आहे. यासाठी जिल्ह्यात गाव पातळीवर विशेष मोहीम राबवून ई-केवायसी व बँक खाते आधारसंलग्न करण्याचे काम मागील दोन महिन्यापासून कृषि विभागामार्फत सुरु आहे. या अनुषंगाने पीएम किसान योजनेतील ई-केवायसी व आधार संलग्न प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांनी 22 सप्टेंबर 2023
जिल्ह्यात अद्यापही 60 हजार 339 लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रलंबित असल्याचे दिसून आले आहे. तसेच 25 हजार 275 लाभार्थाचे आधार संलग्न करणे प्रलंबित आहे. वारंवार संपर्क करूनही ई-केवायसी किंवा आधार संलग्न करण्यासाठी प्रतिसाद देत नसलेल्या लाभार्थ्यांची नाव वगळण्यासाठी शासन स्तरावर सूचना प्राप्त आहेत. सर्व लाभार्थ्यांनी कृषी सहाय्यक व सामाजिक सुविधा केंद्र यांच्या मार्फत किंवा स्वतः ई-केवायसी व आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. त्याशिवाय प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 15 वा हप्ता मिळणार नाही. जे लाभार्थी ई-केवायसी पूर्ण करणार नाहीत किंवा बँक खाते आधार संलग्न करणार नाही त्यांचे नाव या योजनेतून वगळण्यात येणार आहे. सर्व प्रलंबित लाभार्थी यांनी याची दक्षता घ्यावी. गावातील सरपंच, पोलीस पाटील, प्रगतशील शेतकरी यांनी पुढाकार घेऊन कृषी सहायक यांच्या मदतीने ई-केवायसी करण्यासाठी प्रोत्साहित करावे. प्रलंबित लाभार्थ्यांमध्ये मयत व्यक्ती, स्थलांतरित लाभार्थी, कर भरणा करणारे, एक कुटुंबातील एका पेक्षा जास्त लाभार्थी असण्याची शक्यता असून तशी माहिती कृषी विभागामार्फत संकलित करण्यात येत आहे, असेही कृषि विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment