मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त
6 ते 17 सप्टेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन
नांदेड, (जिमाका) दि. 6 :- सहा
सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त कार्यरत 16 मुला-मुलीचे मागासवर्गीय शासकीय वसतिगृह व 4 अनु.जाती शासकीय निवासी शाळेमध्ये चित्रकला, निबंध, वक्तृत्व स्पर्धा व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन, 7 सप्टेंबर रोजी वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर कामांना भेटी देण्यात येणार आहेत, 8 सप्टेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील अनु. जाती व नवबौध्द घटकांच्या व मातंग समाजाच्या वस्त्यांना भेटी देणे व त्यांना सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. 9 सप्टेंबर रोजी रमाई आवास योजनेतून घरकूल मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना भेटी देणे व मनोगत घेणे कार्यक्रमाचे आयोजन. 10 सप्टेंबर रोजी समान संधी केंद्रामार्फत नशामुक्त भारत अभियान अंतर्गत व्यसनमुक्त व शिष्यवृत्ती योजनांच्या माहिती संदर्भात विशेष अभियान राबविणे. 11 सप्टेंबर रोजी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांमध्ये स्वच्छता अभियान कार्यक्रमाचे आयोजन. 12 सप्टेंबर रोजी तृतीय पंथी व्यक्तीना ओळखपत्र वाटप, जात वैधता प्रमाणपत्रे वाटप, ऊसतोड कामगारांना ओळखपत्र वाटप कार्यक्रम. 13 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल. 14 सप्टेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत मंजूर कामांना भेटी देणे. 15 सप्टेंबर रोजी शासकीय वसतिगृह व निवासी शाळेतील विद्यार्थ्यांशी सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन. 16 सप्टेंबर रोजी ज्येष्ठ नागरीकांचे आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिर व जेष्ठ नागरीकांचा सत्कार कार्यक्रम व 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मुख्य कार्यक्रम व पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, असे समाज कल्याण कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment