जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे
17 सप्टेंबर रोजी पीएम स्किल रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन
नांदेड, (जिमाका) दि. 15:- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 7 ते 8 या कालावधीत पीएम स्किल रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉन स्पर्धेत सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय तंत्र प्रशाला केंद्र व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थी व इतर महाविद्यालयातील सर्व प्रशिक्षणार्थी यांनी जास्तीत जास्त संख्येन सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
पीएम स्किल रन मॅरेथॉन स्पर्धा संपूर्ण राज्यात महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविण्यता विभागातर्फे आयोजित करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे 5 कि.मी. अंतराची पीएम स्किल रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन 17 सप्टेंबर रोजी सकाळी 7 ते 8 या वेळेत करण्यात आलेले आहे, असे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर.बी. गणवीर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
0000
No comments:
Post a Comment