Monday, July 10, 2023

युवक-युवतीना नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी उद्योजकांनी रोजगार मेळाव्यात सहभाग नोंदविण्याचे आवाहन

 युवक-युवतीना नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी

उद्योजकांनी रोजगार मेळाव्यात सहभाग नोंदविण्याचे आवाहन  

नांदेड (जिमाका) दि. 10 :- सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविण्यता विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. वारंवार रोजगार मेळावे आयोजित करण्यात येतात. या रोजगार मेळाव्यातून उद्योजक व नोकरी इच्छूक उमेदवार एकाच व्यासपीठावर येतात.  उद्योजक रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून उमेदवारांच्या मुलाखती घेवून नोकरीसाठी निवड करतात. उद्योजकांनी जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राशी सामंजस्य करार करावा, असे आवाहन  कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राच्या सहायक आयुक्त रेणूका तम्मलवार यांनी केले आहे.

जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतीना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी रोजगार मेळाव्यात उद्योजकांनी सहभाग नोंदवावा. उदा. इंडस्ट्री, इंडस्ट्रीज असोसिएशन, प्लेसमेंट एजंसी, बीपीओ, केपीओ, रिटेल आऊटलेट डी मार्ट, जीओ मार्ट, बीग बाजार,क्रोमा, होम अप्लायंसेस, सुपर मार्केटस, शॉपिग मॉल्स, ॲमेझॉन, फिल्पकार्ट, झोमाटो, स्विगी, बीव्हीजी, विविध कल्स्टर यामधील सेक्टर संबंधित इंडस्ट्रिज यांनी आपल्याकडील रिक्तपदांसाठी मुलाखतीचे आयोजन करुन बेरोजगार उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध करुन द्यावी. अधिक माहितीसाठी दू. क्र. 02462-251674 किंवा nandedrojgar@gmail.com वर किंवा योगेश यडपलवार मो.क्र.9860725448, इरफान खान यांचा मो.क्र. 7030555244 वर संपर्क साधावा, असे जिल्हा रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने कळविण्यात आले आहे.

0000   

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...