Friday, June 30, 2023

 जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैठक संपन्न

नांदेड (जिमाका) दि. 30 :- शेतकऱ्यांनी युरिया खताचा अति वापर टाळून पर्यायी नॅनो युरियाचा वापर पिकाच्या वाढीच्या अवस्थेत करावा. किटकनाशक फवारणी करतांना विषबाधा  होण्यासाठी शेतकऱ्यांनी सुरक्षा किटचा वापर करुन फवारणी करावी. कापूस पिकावर गुलाबी बोंडअळी प्रादुर्भाव  होण्यासाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक किड व्यवस्थापन प्रणालीचा वापर करावायाबाबत कृषि विभागाने शेतकऱ्यामध्ये जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या.

 

जिल्हाधिकारी  यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हास्तरीय कृषिनिविष्ठा सनियंत्रण समिती आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस उपविभागीय कृषि अधिकारी रणवीरतालुका कृषि अधिकारी बालाजी मुंडेकृषि अधिकारी जी.एनहुंडेकरजिल्हा व्यवस्थापक एम.आय.डी.सीफडजिल्हा पणन अधिकारी राजेश हेमकेपोलिस निरिक्षक सातपुतेबियाणे  रा.खते कंपनीचे प्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते.

 

या बैठकीत प्रस्ताविक जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी सर्व कंपनी प्रतिनिधी प्रयत्न करावे असे सुचित केलेतसेच कृषि विकास अधिकारी विजय राजेश बेतीवार यांनी रासायनिक खत  बियाणे उपलब्धता बाबत माहितीचे सादरीकरण केलेसर्व कंपनी प्रतिनिधी यांना जिल्हयाच्या पुरवठा नियोजनानुसार रासायनिक खताचा पुरवठा करण्याबाबत सूचना दिल्यासर्व कंपनी प्रतिनिधी यांनी त्यांच्या रा.खत  बियाणे उपलब्धता बाबत माहिती दिली. आभार मोहीम अधिकारी सचिन कपाळे यांनी मानले.

00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...