Friday, June 30, 2023

 प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने

शिकाऊपक्के अनुज्ञप्ती साठी मासिक शिबिराचे आयोजन 


नांदेड (जिमाका) दि. 30 :- प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने शिकाऊ व पक्के अनुज्ञप्तीसाठी जुलै 2023 महिन्यात तालुक्याच्या ठिकाणी शिबिर कार्यालय आयोजित करण्याचे नियोजन केले आहे. या शिबिरासाठी जागा उपलब्धतेच्या अधिन राहून ऑनलाईन अपॉईटमेंट महिना सुरु होण्यापूर्वी 5 दिवसा आधी कार्यालयीन वेळेत सुरु करण्यात येईल. अपॉइटमेंट घेतलेल्या अर्जदारांनी याबाबची नोंद घेऊन शिबिर कार्यालयात उपस्थित रहावेअसे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.


तालुक्याच्या ठिकाणी पुढीलप्रमाणे कॅम्पचे आयोजन केले आहे. कंधार येथे 3 जुलै, धर्माबाद येथे 5 व 21 जुलै, किनवट येथे 7 व 28 जुलै, मुदखेड येथे 10 जुलैमाहूर 12 जुलै, हदगांव 17 जुलैहिमायतनगर 25 जुलै रोजी कॅम्पचे आयोजन केले आहेअसे प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...