Thursday, June 15, 2023

 शासकीय कार्यालयात येताना विना हेल्मेट

दुचाकी वाहन चालविल्यास होणार कारवाई

 

नांदेड (जिमाका) दि. 15 :-

शासकीय कार्यालयात कामानिमित्त येणारे बहुतांशी नागरिक तसेच कार्यालयातील कर्मचारी अधिकारी हे विना हेल्मेट दुचाकी वाहन चालवित असल्याचे  निदर्शनास आले आहे. वाहन चालविताना हेल्मेट वापर करणे हे रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहे. शासकीय कार्यालयात येताना विना हेल्मेट दुचाकी वाहन चालविल्यास मोटार वाहन कायद्यानुसार  कारवाई करण्यात येईल, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.


बहुतांशी दुचाकी वाहनांच्या अपघातांमध्ये जखमी होणारे अथवा मृत पावणारे वाहनस्वार हे हेल्मेटशिवाय प्रवास करणारे असतात.. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने हेल्मेट वापरण्यासंबंधी प्रबोधनात्मक जनजागृती  अंमलबजावणी संबंधी व्यापक मोहिम राबविण्यात येत आहे. विना हेल्मेट दुचाकी वाहन चालविताना आढळून आलेल्या नागरिक कर्मचारी अधिकारी यांचेवर मोटार वाहन कायद्यातर्गंत मोटार वाहन अधिनियम 1988 मधील कलम 194 डी मधील तरतुदीनुसार हेल्मेट वापरासंबंधी तरतुदींचा भंग करणाऱ्या अथवा त्यास संमती  देणाऱ्या व्यक्तीस दंडाची तरतुद आहे. शासकीय कार्यालयामध्ये कामानिमित्त येणाऱ्या  नागरिक कर्मचारी अधिकारी यांनी दुचाकी वाहन चालवितांना स्वत:च्या सुरक्षिततेच्या आणि मोटार वाहन कायद्यानुसार होणारी कारवाई टाळण्यासाठी हेल्मेटचा वापर करावा, असेही प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

0000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...