Thursday, June 15, 2023

धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी नामांकित निवासी शाळेत

प्रवेशासाठी 30 जून पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन  

नांदेड (जिमाका) दि. 15 :-  धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षे सन 2023-24  मध्ये शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत शिक्षण देण्याबाबत योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.  या योजनेअंतर्गत धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या शाळेत प्रवेशासाठी इच्छुक पालकांनी 30 जून 2023 पर्यत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात परिपूर्ण अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त बापू दासरी यांनी केले आहे.

धनगर व त्यांच्या उपजाती समाजातील विद्यार्थ्यांना इयत्ता 1 ली ते 5 वी मध्ये परीपूर्ण अर्ज भरून प्रवेश द्यावा. यासाठी नामांकित शाळेचे नाव पुढीलप्रमाणे आहेत. राजश्री पब्लिक स्कूल, वसरणी, लातूर रोड नांदेड येथे 100 मान्य विद्यार्थी संख्या, शांतिनिकेतन पब्लिक स्कूल, मालेगाव ता. अर्धापूर जि. नांदेड 100 मान्य विद्यार्थी संख्या, लिटील स्टेप इंग्लिश मेडीयम स्कूल, नायगाव (खै,) जि. नांदेड 100 विद्यार्थी संख्या, शंकरराव चव्हाण इं.स्कूल, दत्तनगर, नांदेड 100 विद्यार्थी संख्या या शाळेचा समावेश आहे. या योजनेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावाअसे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त बापू दासरी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...