Thursday, June 1, 2023

छायाचित्रासह मतदार यादीचा

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर 

·  मतदार यादीतील आपली नावे तपासून घेण्याचे आवाहन 

नांदेड, (जिमाका) दि. 1 :- जिल्‍हयातील प्रत्‍येक मतदारांनी मतदार यादीतील आपले तपशिल अचूक आहेत याची खात्री करून घेतली पाहिजे. यात नाव नोंदणी, दुरूस्ती, वगळणी करण्यासाठी नागरिकांनी www.nvsp.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावेत. ज्यांना ऑफलाईन अर्ज सादर करावयाचे आहेत त्यांनी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ), तहसिल कार्यालय किंवा मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.

भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमांतर्गत दिनांक 1 जून ते 16 ऑक्टोंबर 2023 पर्यंत पुनरिक्षण पूर्व कार्यक्रम निर्धारीत केला आहे. तसेच या कार्यक्रमांतर्गत 17 ऑक्टोंबर 2023 रोजी प्रारूप यादी प्रसिद्ध करावयाची असून 5 जानेवारी 2024 रोजी अंतिम यादी प्रसिद्ध करावयाची आहे.

दि. 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम देण्यात आला आहे. सदर कार्यक्रमाच्‍या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर संबंधित बीएलओ मार्फत मतदारांची पडताळणी करण्‍याकरीता घरोघरी भेट देतील तसेच सर्व मतदारांनी आपले मतदार यादीतील नाव, पत्‍ता, लिंग, जन्‍म दिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदार संघ इत्यादी तपशिल मतदार यादीत तपासुन ते अचूक आहे याची मतदारांनी खात्री करून घेतली पाहिजे.

मतदार यादीमध्‍ये ज्‍या मतदाराची नावे नाहीत अशा मतदारांना नमुना-6 मध्‍ये अर्ज सादर करून त्‍यांची नावे मतदार यादीत समाविष्‍ट करता येतील. मतदार यादीत समाविष्‍ट असलेल्‍या नोंदीबाबत आक्षेप असल्‍यास सदर नोंद वगळण्‍यासाठी नमूना-7 मध्‍ये अर्ज सादर करता येतील. त्या मतदार यादीत असलेल्‍या नोंदीबाबत दुरूस्‍ती करावयाची असल्‍यास नमूना-8 मध्‍ये अर्ज सादर करता येतील. हे अर्ज दिनांक 21 जुलै 2023 ते 21 ऑगस्ट 2023 या कालावधीत विहित नमुन्यातील अर्ज प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार यांच्या कार्यालयात तसेच मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्‍याकडे स्विकारण्यात येतील. मतदारांच्या सुलभतेसाठी www.nvsp.in या संकेतस्थावर ऑनलाईन नाव नोंदणीची तसेच यादीतील तपशिलात बदल करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.  00000 

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...