Thursday, June 1, 2023

 दहावी परीक्षेचा 2 जूनला निकाल होणार जाहीर

 

नांदेड (जिमाका) दि. 1 :-  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूरऔरंगाबादअमरावतीपुणेनागपूरमुंबईकोल्हापूरनाशिक व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवार दिनांक 2 जून, 2023 रोजी दुपारी 1 वा. जाहीर केला जाणार आहे. खाली दिलेल्या संकेतस्थळावर मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार हा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात येईल.   

 

मार्च 2023 मध्ये दहावी परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील संकेतस्थळावरुन उपलब्ध होतील. www.mahresult.nic.in http://.sscresult.mkcl.org  https://ssc.mahresults.org.inhttps://hindi.news18.com/news/career/board-results-maharashtra-boardhttps://www.indiatoday.in/education-today/maharashtra-board-class-10th-result-2023http://mh10.abpmajha.com या संकेतस्थळावर सदर माहितीची प्रत / प्रिंट घेता येईल. तसेच

विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

 

ऑनलाईन निकालानंतर दहावी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्यांने संपादित केलेल्या गुण गुणपडताळणी करता येईल. याचबरोबर उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतपुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. हा अर्ज स्वत: किंवा शाळांमार्फत करता येईल. यासाठी आवश्यक अटीशर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.

 

गुणपडताळणी शनिवार 3 जून ते सोमवार 12 जून 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. छायाप्रतीसाठी 3 जून पासून  22 जून 2023 पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल. याचबरोबर याचे शुल्क ऑनलाईन पद्धतीने डेबिट  कार्डक्रिडेट कार्डयुपीएलनेटबँकिंग याद्वारे भरता येईल.

 

मार्च 2023 परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन अर्ज करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसात पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करावा लागेल. विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असे त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

 

मार्च 2023 च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेस सर्व विषयासह प्रविष्ठ होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी जुलै 2023 व मार्च 2024 श्रेणी / गुणसुधार योजनेंतर्गत उपलब्ध राहतील. जुलै-ऑगस्ट 2023 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) पुरवणी परीक्षेसाठी व श्रेणी सुधार विद्यार्थ्यांसाठी बुधवार 7 जून 2023 पासून आवेदन करता येतील. हे आवेदनपत्र संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीने भरून घेण्यात येणार आहेत. मार्च 2023 मध्ये दहावी परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका त्यांच्या माध्यमिक शाळेमार्फत दि. 14 जून 2023 रोजी दुपारी 3 वा. वितरीत करण्यात येतील, असे राज्य मंडळ सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.  

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...