Thursday, June 1, 2023

 डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात

जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा

 

नांदेड, (जिमाका) दि. 1 :- मौखिक आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत जागतिक तंबाखू विरोधी दिन डॉ. शंकरराव चव्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे आज साजरा करण्यात आला. तंबाखू सेवनामुळे होणारे दुष्परिणाम व व्यसनापासून बचाव कसा करता येईल याविषयी अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

 

यावेळी दंतचिकित्स विभाग प्रमुख डॉ. भावना भगत, कान नाक घसा विभागाचे एचओडी डॉ. विनोद कंदकुरे, डॉ. एम. ए. समीर, प्राध्यापक, शरीरविकृतीशास्त्र, सहयोगी प्राध्यापक डॉ. शितल राठोड, औषध वैदयकशास्त्र डॉ. आय. एफ. इनामदार, जन औषध वैद्यकशास्त्र डॉ. व्यंकटेश खडके, सहयोगी प्राध्यापक, औषधशास्त्र यांनी जनजागृतीपर व्याख्याने सादर केली.

 

यावर्षी तंबाखू विरोधी दिनाची थीम 'आम्हाला तंबाखूची नव्हे तर अन्नाची गरज आहे असून तंबाखूमध्ये निकोटीन, टार, आर्सेनिक, नायट्रोसामाइन्स इत्यादी 7 हजार 235 हानिकारक रसायने असतात. भारतातील कर्करोगाच्या घटना 4 फेब्रुवारी 2023 रोजी नोंदविल्यानुसार 2.25 दशलक्ष एवढी आहे. भारतातील सर्व कर्करोगांमध्ये तोंडाच्या कर्करोगाचा समावेश 30 टक्के  आहे. भारतात दरवर्षी तोंडाच्या कर्करोगाची 1.36 लाख नवीन प्रकरणे आढळून येतात आणि त्यांचा मृत्यू दरवर्षाला सुमारे 56 हजार आहे. प्राथमिक तंबाखूच्या सेवनामुळे स्वतःच्या शरीरावर विविध हानिकारक परिणाम होतात. परंतु निष्क्रिय धुम्रपानामुळे इतर व्यक्ती आणि पर्यावरणाला हानी पोहचते. तंबाखूच्या दुष्परिणामांमध्ये उच्च रक्तदाब वाढणे, रक्तवाहिन्या अरुंद होणे, भूक न लागणे, ताणतणावाची पातळी वाढणे, झोप न लागणे यामुळे हृदयविकार, फुफ्फुसाचे आजार, मूत्रपिंडाचे आजार, तोंडाचे कर्करोग आणि फुफ्फुस, यकृत इत्यादींचे कर्करोग यांचा समावेश होतो, अशी माहिती यावेळी देण्यात आली. या कार्यक्रमास सर्व अध्यापक वर्ग, कर्मचारी वर्ग, सुरक्षा रक्षक आदी उपस्थित होते.

000000




No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...