Thursday, April 20, 2023

समता पर्वनिमित्त शासकीय निवासी शाळा व वसतिगृहात रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न


 समता पर्वनिमित्त शासकीय निवासी शाळा व वसतिगृहात

रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्गंत समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने 1 एप्रिल ते 1 मे 2023 या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता पर्व अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातर्गंत सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना थेट जनतेपर्यत पोहोचविण्याच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

 

समता पर्वानिमित्त 19 एप्रिल रोजी जिल्ह्यात समाज कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त कार्यरत मुला-मुलींचे अनु. जाती शासकीय निवासी शाळा व मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह येथे रक्तदान व आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात माहूर येथील अनु. जाती व नवबौध्द मुलीचे शासकीय निवासी शाळेतील मुख्याध्यापक एस.आर.जोशी, सहशिक्षक शिंदे यांनी प्रथम रक्तदान केले. या शिबिरात कर्मचारी व नागरिकांची रक्तदान व आरोग्य तपासणी करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वसतीगृह शाखेचे समाज कल्याण निरीक्षक पी.जी. खानसोळे यांनी सर्वाचे आभार मानले.  

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक    377 फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करणे बंधनकारक    नांदेड दि. 11 एप्रिल :- पुनर्रचित हवामान आ...