Friday, April 7, 2023

 डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात

अवयवदान जनजागृती मोहिमेस सुरुवात 

 

नांदेड दि. 7 :- आज जागतिक आरोग्य दिन औचित्य साधून महाराष्ट्र शासनाचे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्या मार्गदर्शनाद्वारे अवयदान जनजागृती अभियान मोहिमेस आज सुरुवात करण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाह्य रुग्ण विभागा महाविद्यालयातील विविध शाखांचे विद्यार्थी यांच्यासाठी रांगोळी तसेच पोस्टर  स्पर्धा आज आयोजित करण्यात आली होती. या महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ पी. टी जमदाडे यांच्या हस्ते रांगोळी स्पर्धा व पोस्टर स्पर्धा यांचे  उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणामध्ये एमबीबीएस विद्यार्थ्यांच्या समुहाने अवयव दानावर उत्कृष्ट पथनाट्य सादर केले. त्यानंतर या ठिकाणी अवयव दान जनजागृती मोहिमेअंतर्गत अवयव दानाचे महत्त्व याबद्दल मार्गदर्शनपर कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली.

 

अधिष्ठाता डॉ. पी. टी. जमदाडे यांनी 2016 साली दोन रुग्णांनी अवयव दान केले होते त्यावेळेस ग्रीन कॉरिडोर करण्यात आला होता याबद्दल माहिती दिली. अवयव दान करणे हीच खरी जनजागृती आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. उपस्थित डॉक्टरांनी आपल्या रुग्णालयामध्ये येणारे जे रुग्ण मेंदू मृत्यूमुळे दाखल होतात अशा रुग्णांच्या नातेवाईकांना समुपदेशन करून अवयवदानास प्रोत्साहित करावे असेही त्यांनी सांगितले.

 

बाधिरिकरण  शास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. नितीन नंदनवनकर यांनी अवयवदान किती प्रकारचे असते आणि कुठकुठल्या अवयवाचे अवयदान करता येते याबद्दल माहिती सांगितलीअवयव दान जनजागृती मोहीम ही वर्षभर राबविण्यात येणार असून यामध्ये नांदेड शहरातील विविध ठिकाणी या विषयाचे  मार्गदर्शन करण्यात येणार आहे. वैद्यकीय अध्यापकांच्या दहा टीमद्वारे एकूण 20 ठिकाणी अशा प्रकारचे मार्गदर्शनपर सत्र ठेवण्यात येणार आहे, असे सांगितले. बधिरीकरन शास्त्र विभागाच्या प्राध्यापिका व विभाग प्रमुख डॉ. वैष्णवी कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात अवयव दान हे किती महत्त्वाचे आहे व त्यामुळे मानवाचे आयुष्य हे वाचू शकते याबद्दल माहिती दिली. पथनाट्यचर्चासत्रेअवयवदान केलेले रुग्णांचे नातेवाईक आणि रुग्ण यांच्याशी संवाद असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

 

या कार्यक्रमानिमित्ताने सर्व अध्यापकविद्यार्थीनर्सेस यांनी अवयवदान जनजागृती बद्दल प्रतिज्ञा घेतली. रांगोळी स्पर्धेमध्ये विजेत्या झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. यामध्ये आकांक्षा लाठकर आणि स्नेहल सूर्यवंशी यांना प्रथम पारितोषिक देण्यात आले. द्वितीय पारितोषक प्रिया आणि विक्रांत यांना देण्यात आले आणि तृतीय पारितोषक निकिता थोरात या विद्यार्थींनीला देण्यात आले. तसेच पोस्टर स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषक युवराज भोसलेऋषील सुराणा आणि मित शहा यांना मिळाले द्वितीय पारितोषक रूपाली गाभणे आणि तृतीय पारितोषिक बादल जाधव यांना देण्यात आले.

 

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील उप अधिष्ठाता  डॉ. हेमंत  गोडबोलेशा वै महाविद्यालय परभणीचे अधिष्ठाता डॉ. संजय कुमार मोरेडॉ. सुधा करडखेडकरडॉ. अनुजा देशमुखडॉ किशोर राठोडडॉ. कपिल मोरेडॉ. देगावकर अनिलडॉ. मुकुंद कुलकर्णीडॉ. मनुरकर गणेशडॉ. उमेश आत्रामडॉ अभिजित देवघरे हे उपस्थित होते. तसेच आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटीलडॉ. मंगेश नळकांडे, डॉ. गवई व पदवीपूर्व आणि पदव्युत्तर  विद्यार्थीरुग्णांचे नातेवाईकमहाविद्यालय व रुग्णालय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. उत्कर्ष थोरात व डॉ. अनिकेत वानखेडे यांनी केले तर आभार डॉ. सचिन तोटावार यांनी मानले.

-----



No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...