Friday, April 7, 2023

 डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात

प्रथमच रक्तशुध्दीकरण उपचार पध्दतीचा वापर करुन अतिगंभीर रुग्ण ठणठणीत बरा

 

नांदेड, दि. 7 :- उमरखेड येथील रहिवासी संग्राम चिंचोली वय वर्षे 36 यांना हाता-पायाला लकवा मारल्याने 14 मार्च 2023 रोजी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे दाखल करण्यात आले. हा रुग्ण GBS (जी.बी.एस) या गंभीर व दुर्मिळ आजाराने ग्रस्त होता. रुग्णास अन्न गिळायला आणि श्वास घ्यायाला त्रास होत असल्याने त्यास अतिदक्षता विभागात स्थलांतरीत करण्यात आले व व्हेंटीलेटवर काही दिवस ठेवण्यात आले.

 

रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांच्या व मेंदुरोग तज्ज्ञाच्या सल्यानुसार त्याला रक्तशुध्दीकरणाच्या (Plasmapharesisपाच सायकल देण्यात आल्या, त्यासोबत 25 पांढऱ्या पेश्या लावण्यात आल्या. ही प्रक्रिया डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड या संस्थेत पहिल्यांदाच वापरण्यात आली आहे.  त्यासोबत रुग्णाला फिजिओथेरपी Physiotherapy पण देण्यात आली. Plasmphesis ही अत्यंत प्रभावी प्रक्रिया करण्यात आल्यामुळे रुग्णाची लक्षणात सुधारणा झाली. त्याला श्वास घेण्याचा व अन्न गिळण्याचा त्रास कमी झाल्यामुळे त्यास साधारण वॉर्डमध्ये स्थलांतरीत करून पुढील देखभाल करण्यात आली. एकंदरीत रुग्ण 25 दिवसात ठणठणीत बरा झाला व त्याला सुट्टी देण्यात आली. 

 

याप्रसंगी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. पी. टी. जमदाडेवैद्यकीय अधीक्षक डॉ. पी. एस .बोडकेमेडीसीन विभागप्रमुख डॉ. डी. पी. भुरकेपथक प्रमुख डॉ. उबेद खानडॉ. गोविंद लेलेडॉ. भारती राठोडडॉ. रविणाडॉ. यशडॉ. ऐश्वर्याडॉ. सुरज व डॉ. आश्विनी यांची उपस्थिती होती. रुग्णाच्या सुधारणेसाठी डॉ. अफ्रीज अन्सारी व किडनीकिवार तज्ज्ञ डॉ. बाळकृष्ण मोरे यांचे विशेष सहकार्य लाभले.

0000 



No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...