Friday, February 24, 2023

वृत्त क्रमांक 85

 परिवहन विभागाच्या फेसलेस

सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन

 

नांदेड, (जिमाका) दि. 24 :-प्रादेशिक परिवहन विभागातर्फे वाहन, अनुज्ञप्ती व परवाना विषयीच्या 20 सेवा फेसलेस करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या योजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.

 

या फेसलेस सुविधेत अनुज्ञप्ती मध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती, वाहन चालक अनुज्ञप्ती नुतनीकरण, वाहन चालक अनुज्ञप्ती वरील पत्ता बदलणे, अनुज्ञप्ती मध्ये मोबाईल नंबर अद्यावत करणे,अनुज्ञप्ती माहिती (DL Extract) मिळविणे, दुय्यम कंडक्टर अनुज्ञप्ती, कंडक्टर अनुज्ञप्तीचे नुतनीकरण, दुय्यम वाहन चालक अनुज्ञप्ती, शिकाऊ अनुज्ञप्ती वरील पत्ता बदल, कंडक्टर अनुज्ञप्ती वरील पत्ता बदल या सुविधाचा समावेश आहे. वाहनांमध्ये दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र, ना -हरकत प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्रावरील पत्ता बदलणे, वाहन कर्ज बोजा रद्द करणे, वाहन हस्तांतरण, तात्पुरती वाहन नोंदणी, दुय्यम योग्यता प्रमाणपत्र याचा समावेश आहे. परवाना सुविधेत वाहनांकरिता विशेष परवाना, वाहनांकरिता तात्पुरता परवाना, धोकादायक मालवाहने चालविण्यास मान्यता या सुविधांचा समावेश आहे असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...