Friday, February 24, 2023

वृत्त क्रमांक 84

 शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न

 

नांदेड, (जिमाका) दि. 24 :- वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त 19 फेब्रुवारी पासून रक्तदान अभियान सुरु केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवार 21 फेब्रुवारी रोजी कै.शं.च.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तपेढीच्या सहकार्याने शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय नांदेड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

 

या रक्तदान शिबिरात महाविद्यालयातील अध्यापक, पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी यांनी रक्तदान शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. या शिबिरात 92 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. वाय.आर.पाटील यांनी केले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. राजेंद्र अमिलकंठवार, शिबिर संयोजन वैद्य मंगेश नळकांडे यांच्यासह महाविद्यालय व रुग्णालयातील अध्यापक, पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी तसेच कर्मचारी यांची उपस्थिती होती.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...