अहिल्या शेळी योजनेत अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 23 :- राज्यात शेळी पालन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत ग्रामीण परसबाग शेळी विकास योजना आहे. या योजनेतर्गंत राज्यातील वय वर्षे 18 ते 60 मधील अनुसूचित जाती/जमाती, दारिद्र रेषेखालील, अल्पभूधारक (1 ते 2 हेक्टरपर्यंत भूधारक) अशा लाभार्थ्यांकडून रविवार 25 डिसेंबर 2022 पर्यत अर्ज मागविण्यात येत आहेत. महिला अर्जदारांना प्राधान्य देण्यात येणार आहे असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शशांक कांबळे यांनी केले आहे.
या योजनेची माहिती/अर्ज सादर करण्याची कार्यपध्दती याबाबत संपूर्ण तपशील www.mahamesh.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन पध्दतीने अर्ज महामंडळाच्या www.mahamesh.co.in संकेतस्थळावर तसेच ॲन्ड्राईड मोबाईल मधील गुगल प्ले स्टोअर वरुन अहिल्या योजना ॲपद्वारे वरील दिलेल्या दिनांकामध्येच करण्यात यावे. अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्विकारले जातील यांची नोंद घ्यावी. इच्छूक अर्जदारांनी योजनेचे विहित कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत असेही कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment