लम्पी प्रतिबंधक बाबत निराधार वृत्तावर विश्वास ठेवू नये
45 लाखांची उधळपट्टी या आशयाचे वृत्त निराधार
नांदेड (जिमाका) दि. 28 :- काही वर्तमानपत्रात लम्पी प्रतिबंधक प्रचारावर 45 लाखांची उधळपट्टी या आशयाची निराधार बातमी छापून लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. अशा बातम्यांवर विश्वास ठेवण्यात येवू नये, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थान माळेगाव यात्रा तालुका लोहा, जिल्हा नांदेड येथे 22 ते 26 डिसेंबर 2022 दरम्याने जिल्हा परिषदेमार्फत भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा नियोजन समितीमार्फत 45 लाख रुपये नियतव्यय मंजूर आहे. या तरतुदीमधून पशुसंवर्धन विभागामार्फत विभागाचा स्टॉल, भव्य अश्व, श्वान, शेळी आणि कुक्कूट प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये सहभागी पशुंना बक्षीस वितरण, सहभाग भत्ता, शेतकऱ्यांसाठी माहितीपर पुस्तिका, घडीपत्रिका आणि अनुषंगिक बाबींसाठी शासन निर्णय 30 ऑगस्ट 2010 च्या अधीन राहून अंदाजे 16 लक्ष खर्च होत आहे. उर्वरित 29 लक्ष रुपये शासनखाती भरणा करण्यात आली अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भुपेंद बोधनकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
00000
No comments:
Post a Comment