Wednesday, July 27, 2022

 आयटीआय प्रथम फेरीस 28 जुलैपासून सुरुवात


नांदेड (जिमाका) दि. 27 :- आयटीआयच्यावतीने ऑनलाईन प्रवेश प्रथम फेरीस गुरुवार 28 जुलै 2022 पासून सुरुवात होणार आहे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य एम. एस. बिरादार यांनी केले आहे.

आयटीआय प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या व प्रवेश निश्चिती ट्रेड भरलेल्या प्रशिक्षणार्थ्यांची प्रथम प्रवेश फेरी केंद्रीय पध्दतीनुसार होणार आहे. प्रथम फेरीची निवड यादी लागली आहे. ट्रेडसाठी निवड झाली आहे त्यानुसार युवक व युवतीना ट्रेडला दिलेल्या वेळेनुसार प्रवेश रितसर मूळ कागदपत्रे दाखल करुन नियमानुसार घ्यावा लागेल. पहिल्या प्रवेश फेरीचे प्रवेशास सुरुवात झाली असून संकेतस्थळावर दिलेल्या नियमानुसार युवक व युवतीस प्रवेश दिला जाईल. वेळेनंतर व दिनांकानंतर आलेल्या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन  पध्दतीत विचार केला जात नाही. प्रथम फेरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी त्वरीत आपला प्रवेश निश्चित करावा. अधिक माहितीसाठी शासकीय  आयटीआय प्रवेश विभागाशी संपर्क साधावा असेही आवाहन प्राचार्य एम.एस. बिरादार यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...