Monday, February 28, 2022

 दहावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण 

नांदेड (जिमाका) दि. 28  :- माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल 2022 या कालावधीत होणार आहेत. कोविड-19 या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सन 2021-22 या वर्षात इयत्ता 10 वीच्या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचा इयत्ता सातवी व आठवीतील क्रीडा स्पर्धेतील सहभागाचा विचार केला जाणार आहे. या विद्यार्थ्यांस सन 2021-22 साठी सवलतीचे क्रीडा गुण देण्यात येतील. ही सवलत केवळ सन 2021-22 वर्षाच्या परीक्षेसाठी देय राहील, असे लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी कळविले आहे.  

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...