Monday, February 28, 2022

 चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या

विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण 

नांदेड (जिमाका) दि. 28  :-  माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याबाबतची सुधारीत कार्यपध्दती विहित करण्यात आलेली आहे. 

विद्यार्थी एलिमेंटरी परीक्षा उत्तीर्ण असल्याशिवाय इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेचे गुण न देण्याची तरतूद आहे. परंतु कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सन 2021-22 या वर्षी इयत्ता 10 वीच्या परीक्षेला बसणाऱ्या  विद्यार्थ्यांना सन 2020-21 या वर्षी एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षेला श्रेणीच्या आधारे, त्यांना सन 2021-22 या वर्षापुरते सवलतीचे गुण देण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. हा निर्णय फक्त सन 2021-22 या शैक्षणिक वर्षापुरता लागू राहील  यांची सर्व माध्यमिक शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी , पालक व संबंधित घटकांनी नोंद घ्यावी,  असे आवाहन राज्यमंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे. 

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...