बेरोजगार युवक-युवतींसाठी ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे आयोजन
नांदेड (जिमाका) दि. 25 :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्रातर्फे 26 ते 29 जानेवारी 2022 या कालावधीत ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे हस्ते 26 जानेवारी रोजी पोलीस मुख्यालय, कवायत मैदान, वजिराबाद नांदेड येथे होणार आहे.
जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी
महास्वयंम https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी
कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक (02462)251674 किंवा कार्यालयाचा ई-मेल आयडी nandedrojgar@gmail.com वर संपर्क
साधावा, असे
आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक
आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे. या रोजगार मेळाव्यास जिल्हाधिकारी डॉ.
विपीन इटनकर, जिल्हा
परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर हे उपस्थिती असणार आहेत.
या रोजगार मेळाव्यात एकूण 32 नामांकित कंपन्याचे एकूण 3 हजार 550 रिक्त पदांची ऑनलाईन भरती होणार आहे असेही
प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
000000
No comments:
Post a Comment