पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा नांदेड दौरा
नांदेड (जिमाका) दि. 21 :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शनिवार 22 जानेवारी 2022 रोजी मुंबई येथून विमानाने सकाळी 8.30 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. दुपारी 2.30 वा. सावरगावमाळ आरोग्य उपकेंद्र नूतन इमारतीच्या भूमिपूजन समारंभास उपस्थिती. दुपारी 3.30 वा. पाळज आरोग्य उपकेंद्र नूतन इमारतीच्या भुमीपूजन समारंभास उपस्थिती.
रविवार 23 जानेवारी 2022 रोजी दुपारी 12 वा. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील परिसरात दोनशे मुलांच्या वसतीगृहाच्या बांधकामाच्या भूमीपूजन समारंभास उपस्थिती. दुपारी 3.30 वा. भोकर पाणी टंचाई आराखडा बैठकीस उपस्थिती. स्थळ नियोजन भवन नांदेड.
सोमवार 24 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10 वा. बैठकीसाठी राखीव. स्थळ नियोजन भवन नांदेड.
मंगळवार 25 जानेवारी 2022 रोजी दुपारी 12 वा. अर्धापूर तालुक्यातील धामदरी येथील विविध विकास कामाच्या भूमीपूजन समारंभास उपस्थिती. दुपारी 2.30 वा. अर्धापूर तालुक्यातील गणपूर येथील विविध विकास कामांच्या भूमीपूजन/लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 4 वा. अर्धापूर ग्रामीण रुग्णालय इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती.
बुधवार 26 जानेवारी 2022 रोजी सकाळी 9.15 वा. प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभास उपस्थिती. स्थळ पोलीस मुख्यालय कवायत मैदान वजिराबाद नांदेड. दुपारी 1.45 वा. नांदेड येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
00000
No comments:
Post a Comment