राज्यसेवा पूर्व परीक्षेचे रविवार 23 जानेवारीला आयोजन
नांदेड (जिमाका) दि. 12 :- राज्यसेवा पुर्व परीक्षेच्या तारखेत बदल होवून ही परीक्षा आता रविवार 23 जानेवारी 2022 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परिक्षेसाठी पूर्वी जाहीर करण्यात आलेले अधिकारी-कर्मचारी यांची नियुक्ती रविवार 23 जानेवारी 2022 रोजीच्या परीक्षेसाठी कायम करण्यात आली आहे. याबाबत पूर्वी काढलेल्या आदेशात कोणताही बदल केला नाही. जे अधिकारी, कर्मचारी परीक्षा कामी परीक्षा उपकेंद्रावर गैरहजर राहतील यांची गंभीर दखल घेण्यात येईल असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.
परीक्षेच्या दिवशी नियुक्त करण्यात आलेले
अधिकारी, कर्मचारी यांनी कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेले
प्रमाणपत्राची प्रत सोबत बाळगणे आवश्यक राहील. ज्या अधिकारी, कर्मचारी यांचे दोन डोस झालेले नाहीत त्यांची
आरटीपीसीआर कोविड-19 तपासणी करुन अहवाल जवळ बाळगणे आवश्यक आहे. एखाद्या
कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी सकारात्मक आढळून आल्यास त्यांच्या बदली पर्यायी
कर्मचाऱ्यांची व्यवस्था संबंधित अधिकारी, कर्मचारी यांचे कार्यासन प्रमुखांनी करावी. तसा अहवाल जिल्हाधिकारी
कार्यालयास कळविण्यात यावा असेही जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आलेले आहे.
00000
No comments:
Post a Comment