Thursday, January 13, 2022

 जिल्ह्यातील युवक, लाभार्थ्यांसाठी उद्यमिता प्रकल्प

नांदेड (जिमाका) 13 :- कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालय व लेट्स इंडोर्स संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्ह्यात 200 उद्योजक घडविण्यासाठी प्रोजेक्ट उद्यमिता हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. युवकांनी तसेच व्यवसाय करण्याची इच्छा असलेल्या लाभार्थ्यांनी या प्रकल्पाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे. 

शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालय आणि लेट्स इंडोर्स संस्था यांच्या भागीदारीतून उद्यमिता हा प्रकल्प नांदेड, यवतमाळ, रायगड, पुणे, नाशिक, आणि चंद्रपूर जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. याद्वारे शेकडो अतिसूक्ष्म, सूक्ष्म, लघु उद्योजकांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पाअंतर्गत नांदेड जिल्ह्यात 200 उद्योजक घडविण्यात येणार आहेत. आतापर्यंत या प्रकल्पांतर्गत 30 लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून देण्यास व बँकेत कर्ज प्रस्ताव करण्यास सहकार्य केले आहे. 

प्रकल्प उद्यमिता हा अनोख्या शैलीमध्ये इच्छूक उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या उद्देशाने उभी केलेली यंत्रणा आहे. यामध्ये स्थानिक पातळीवर व्यवसाय, बचतगटांचे लघुउद्योग, गृह उद्योग, जोड व्यवसाय आणि इतर उपजीविकेचे साधने भक्कमपणे उभी करून उद्योजकांचे उत्पादन वाढ करण्यासाठी नियोजन व प्रयत्न केले जाणार आहेत. शासनाच्या प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, पंतप्रधान मुद्रा योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, कौशल्य विकास अभियान, इतर सर्व आर्थिक मागास विकास महामंडळे यासारख्या राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी विनामुल्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...