Thursday, January 13, 2022

महाडीबीटी पोर्टलवरील शिष्यवृत्ती अर्जाची पडताळणी  

नांदेड (जिमाका) दि. 13 :- विद्यार्थी, महाविद्यालय व विद्यापीठ स्तरावरील सन 2019-20, 2020-21 2021 -22 मधील अर्ज विहित वेळेत फॉरवर्ड झाले नाहीत हे अर्ज आपोआप रद्द होतील. हे अर्ज रद्द झाल्यास याची जबाबदारी महाविद्यालय प्राचार्य, विद्यापीठाचे कुलसचिव संबंधित विद्यार्थ्यांची राहील. विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास प्राचार्य, विद्यापीठ व विद्यार्थ्यांची जबाबदारी राहील. शिष्यवृत्तीचे महाडीबीटी पोर्टलवरील अर्ज महाविद्यालयांनी आवश्यक कागदपत्राची तपासणी करुन अर्जावर कार्यवाही करावी, असे आवाहन उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. वि. रा. मोरे यांनी केले आहे. 

संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या महाडीबीटी पोर्टलवरील शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी अर्जाची तात्काळ पडताळणी संस्था, महाविद्यालय व विद्यापीठ स्तरावरुन करण्याच्या सूचना देण्यात आलेली आहे. डॅशबोर्ड अहवालानुसार सन 2019-20 व सन 2020-21 मधील विद्यार्थ्याचे अर्ज संस्था, महाविद्यालय व विद्यापीठ स्तरावर प्रलंबित आहेत या अर्जाची पडताळणी करुन तात्काळ अर्ज निकाली काढण्यात यावेत, असेही आवाहन उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. वि. रा. मोरे यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...