राज्य मार्ग परिवहन महामंडळात
शिकाऊ उमेदवारांसाठी भरती
नांदेड (जिमाका) दि. 30 :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागामध्ये सन 2021-22 सत्रासाठी वेगवेगळया व्यवसायासाठी शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी) म्हणुन 56 पदे ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येणार आहेत. आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी www.apprenticeshipindia.org व अभियांत्रिकी, पदवीधर, पदवीकाधारक उमेदवारांनी www.mhrdnats.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करावी. नोंदणी नंबर जनरेट झाल्यानंतर एमएसआरटीसी विभाग नांदेड या आस्थापनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येतील. अर्ज केल्यानंतर विभागाचे विहित नमुन्यातील छापील अर्ज भरुन तो 14 जानेवारी रोजी 3 वाजेपर्यंत विभागीय कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन राज्य परिवहन विभागाच्या नांदेड विभाग नियंत्रकांनी केले आहे.
शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी) म्हणुन 56 पदे ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येणार आहेत. यात (यांत्रिक-36, विजतंत्री-6, शिट मेटल वर्क्स-10, पेंटर-1, वेल्डर (गॅस ॲन्ड इलेक्ट्रीक)-1 अभियांत्रिक पदवीधर/पदवीकाधारक-2 अशी एकुण 56 जागा आहेत. या जागांपैकी अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती व दिव्यांगासाठी शिकाऊ उमेदवार कायद्यानुसार जागा आरक्षीत आहेत) या जागेसाठी विहीत नमुन्यातील छापील अर्ज आस्थापना शाखा विभागीय कार्यालय रा.प. नांदेड येथे 14 जानेवारी 2022 रोजी 3 वाजेपर्यंत शनिवार व सुट्टीचे दिवस वगळुन सकाळी 10 ते दुपारी 3 यावेळेत मिळतील व लगेच स्विकारले जातील. या अर्जाची किंमत जीएसटी 18 टक्केसह खुल्या प्रवर्गासाठी 590 रुपये व मागासवर्गीयांसाठी 295 रुपये आहे. ही शिकाऊ उमेदवार भरती नांदेड जिल्ह्यासाठी असून केवळ नांदेड जिल्हयातील आयटीआय/अभियांत्रिकी महाविद्यालयात उत्तीर्ण उमेदवारांचीच शिकाऊ उमेदवार म्हणून भरती करण्यात येणार आहे. नांदेड जिल्हा व्यतीरीक्त इतर जिल्हयातील आयटीआय/अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा अर्ज व मागील 3 वर्षापुर्वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही, असेही राज्य परिवहन विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment