आरोग्यवर्धक दिवाळीसाठी नांदेड जिल्हावासीयांनो
कोरोनाचे निर्देश पाळणे
गरजेचे
- जिल्हाधिकारी डॉ. विपीन
इटनकर
नांदेड (जिमाका) दि. 29 :- कोविड-19 पार्श्वभूमीवर दिवाळी साजरी करतांना नियंत्रीत होत आलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावाचा विसर न पडू देता नांदेड जिल्हावासी अधिक जबाबदारीने काळजी घेऊन हा उत्सव साजरा करतील, अशा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला. दिवाळी उत्सव 2021 बाबत राज्य शासनाच्या गृह विभागाने मार्गदर्शक सूचना निर्गमीत केल्या असून त्याचे काटेकोर पालन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दिवाळी निमित्त कपडे, फटाके, दागदागिने व इतर वस्तू खरेदी करण्यासाठी दुकाने, मॉल्स, शोरुम व रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी टाळली पाहिजे. ज्येष्ठ नागरिक, लहान बालके यांनी घराबाहेर शक्य तो पडण्याचे टाळावे. कोरोना बाधित नागरिकांना फटाक्यांच्या धुरामुळे त्रास होऊ नये व वायु, ध्वनी प्रदुषण पातळी वाढू नये म्हणून फटाके फोडण्याचे टाळावे व दिव्यांची आरास करुन उत्सव साजरा करावा, असे यात स्पष्ट केले आहे. सध्या कोरोनाचे नियम शिथील करण्यात आले असले तरी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर एकत्रित येण्यावर निर्बंध कायम ठेवावेत. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम दिपावली पहाट आयोजित करतांना मार्गदर्शक सूचनांमधील नियमांचे काटेकोर पालन करावे. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्याचे उपक्रम, शिबीरे रक्तदान आयोजित करणे उचीत राहील.
कोविड-19 रोगाचा प्रादुर्भाव विचारात घेता गेल्या दिड वर्षापासून सर्व धर्मीय सण, उत्सव अत्यंत साध्या पध्दतीने व लोकांनी एकत्रित न येता साजरे केले आहेत. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अजूनही कोरोनाचा धोका कायम करणे उचित होणार नाही. उत्सव साजरा करताना सर्व नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. त्याअनुषंगाने पुढील मागदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.
कोविड-19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशान्वये ब्रेक द चेन अंतर्गत दिलेल्या सुधारित मार्गदर्शक सुचनाचे पालन करावे. कोविड संसर्गामूळे बंद करण्यात आलेली राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्यात आलेली असली तरीही दिपावली उत्सव घरघुती स्वरुपात मर्यादित राहील यांची दक्षता घेण्यात यावी. दिपावली उत्सवा दरम्यान कपडे, फटाके, दागदागिने व इतर वस्तु खरेदी करण्यासाठी दुकानांत व रस्त्यांवर गर्दी होत असते. नागरिकांनी शक्यतोवर गर्दी टाळावी. विशेष करुन जेष्ठ नागरिक तसेच लहान बालके यांनी घराबाहेर पडण्याचे टाळावे. तसेच मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. कोरोनाचा संसर्ग संक्रमन वाढणार नाही. दिपावली हा दिव्यांचा तसेच प्रकाशाचा उत्सव मानला जातो. या उत्सवादरम्यान मोठया प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येते. त्यामूळे वायु व ध्वनी प्रदुषणाची पातळी वाढून जनसामान्यांना तसेच प्राणीमात्रांच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम दिपावली उत्सवानंतर बराच कालावधीपर्यत दिसून येतात. कोरोना आजार झालेल्या किंवा होऊन गेलेल्या नागरिकांना फटाक्यांच्या धुरामूळे वायु प्रदुषणाचा त्रास होण्याची भीती आहे. ही बाब विचारात घेऊन नागरिकांनी चालू वर्षी फटाके फोडण्याचे टाळावे. त्याऐवजी दिव्यांची आरास करुन उत्सव साजरा करावा.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 24 सप्टेंबर रोजीच्या आदेशान्वये ब्रेक द चेन अंतर्गत दिलेल्या सूचनांनुसार कोरोनाचे नियम शिथील करण्यात आले असले तरी देखील नागरिकांनी मोठया प्रमाणावर एकत्रित येण्यावर निर्बंध कायम ठेवले आहेत. सार्वजनिक कार्यक्रम उदा. दिपावली पहाट आयोजित करतांना या मार्गदर्शक सूचनामधील सूचनामधील नियमांचे काटेकोर पालन होईल यांची दक्षता घ्यावी. शक्यतोवर अशा कार्यक्रमाचे ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुक इत्यादी माध्यमांद्वारे प्रसारण करण्यावर भर देण्यात यावा. सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/शिबिरे (रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. मात्र त्या ठिकाणी देखील लोकांनी एकाच वेळी मोठया प्रमाणावर एकत्रित येऊ नये, याची दक्षता घेण्यात यावी. सर्वोच्च न्यायालयाच्या रिट पिटीशन क्र. 728/2015 दि. 23 ऑक्टोंबर 2018 तसेच सिव्हील अपिल क्र. 2865-2867/2021 निर्णय दि. 23 जुलै 2021 मधील आदेशांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे.
कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या
मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका,
पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे
बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष उत्सव सुरु होण्याच्या मधल्या
कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे, असे
स्पष्ट केले आहे.
00000
No comments:
Post a Comment