कोविड रुग्णालयाच्या प्राणवायू नलिका प्रणाली
तपासणी शासकिय तंत्रनिकेतनकडून पूर्ण
नांदेड, दि. (जिमाका) 3 :- राज्यातील कोविड हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या प्राणवायू नलिका व प्रणाली तपासून त्याबाबत त्रुटी आढळू नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले होते. या निर्देशानुसार राज्याचे तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. नांदेड जिल्ह्यातील सर्व कोविड रुग्णालयातील तपासणी करुन घेण्याची जबाबदारी शासकिय तंत्रनिकेतन यांच्याकडे सोपवून तसा अहवाल देण्याचे निर्देश दिले होते.
यानुसार नांदेड जिल्ह्यांतर्गत संपूर्ण कोविड
हॉस्पिटलच्या तपासणीची जबाबदारी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी येथील शासकिय
तंत्रनिकेतनकडे ही जबाबदारी दिली. सदर काम चोख पार पाडण्यासाठी अतिरिक्त
जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली श्री
गुरुगोविंद सिंघजी आभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेचे संचालक डॉ. यशवंत जोशी, शासकिय तंत्रनिकेतन, आयटीआयचे प्राचार्य
यांची समिती गठीत करण्यात आली. या समितीच्या मार्गदर्शनाखाली डॉ. एस. एस. चौधरी,
डॉ. डी. जी. कोल्हटकर, डॉ. एस. व्ही. बेट्टेगिरी, व्ही. बी. उश्केवार, ए. बी.
दमकोंडवार, पी. एस. लिंगे, जी. एम. बरबडे, बी. एस. फुलवळे, एस. ए. कुलकर्णी, डी.
जी. चव्हाण, आर. डी. गेडेकर, एम. एम. मेश्राम यांच्या पथकाने नांदेड जिल्ह्यात 59
शासकीय व खाजगी कोविड रुग्णालयातील प्राणवायु नलिका व यंत्रणेची तपासणी केली.
00000
No comments:
Post a Comment