Tuesday, May 11, 2021

जिल्ह्यात 89 केंद्रावर लसीकरण सुरु आज 11 मे अखेर 3 लाख 72 हजार 502 नागरिकांचे लसीकरण

                                                     जिल्ह्यात 89 केंद्रावर लसीकरण सुरु

आज 11 मे अखेर 3 लाख 72 हजार 502 नागरिकांचे लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 11 :-  लसीकरणासाठी जनजागृतीनंतर जिल्ह्यात मोठया प्रमाणात नागरिक लसीकरणासाठी पुढे सरसावले आहेत. यात युवा वर्गाचाही मोठा उत्साह दिसून येत आहे. गरजेप्रमाणे जिल्ह्यात लसीकरणाचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जात असून येत्या काही दिवसात लसीचा पुरवठा सुरळीत होईल असे, प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

 

दिनांक 11 मे अखेरपर्यत नांदेड जिल्ह्याला कोविशिल्ड 3 लाख 23 हजार 730 व कोव्हॅक्सीन 96 हजार 440 एवढा डोसेसचा साठा प्राप्त झाला असे एकूण 4 लाख 20 हजार 170 एवढे डोसेस आहेत. दि. 10 मे अखेरपर्यंत जिल्ह्यात एकूण 3 लाख 72 हजार 502 लाभार्थ्यांचे आरोग्य विभागाने लसीकरण यशस्वी करुन दाखविले आहे.

लसीकरणासाठी चार गट तयार करण्यात आले आहे. यात हेल्थ केअर वर्कर गटातील 19 हजार 147 व्यक्तींना पहिला डोस तर 9 हजार 826 व्यक्तींना दुसरा डोस देण्यात आला आहे यांची एकूण संख्या 28 हजार 973 एवढी होते. फ्रंटलाईन वर्कर गटातील 30 हजार 110 व्यक्तींना पहिला डोस तर 9 हजार 183 व्यक्तींना दुसरा डोस देण्यात आला आहे. यांची एकूण संख्या 39 हजार 293 एवढी होते. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 21 हजार 658 व्यक्तींना पहिला डोस देण्यात आला आहे. 45 वर्षावरील गटातील 2 लाख 51 हजार 402 व्यक्तींना पहिला डोस तर 31 हजार 176 व्यक्तींना दुसरा डोस देण्यात आला आहे. यांची एकूण संख्या 2 लाख 82 हजार 578 एवढी होते. या चारही गटाची एकूण संख्या 3 लाख 72 हजार 502 एवढी आहे. जिल्ह्यातील उर्वरित लोकांचे लसीकरण अधिक सुरळीत व्हावेत यासाठी आरोग्य विभागाचे नियोजन केलेआहे.

मनपा हद्दीत जिल्हा रुग्णालय , वैद्यकीय महाविद्यालय, आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाना, हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, कौठा असे एकूण 6 केंद्रावर  कोविशिल्ड लस 18 ते 44 व 45 वर्षावरील लाभार्थी यांच्यासाठी उपलब्ध आहे. शहरी हद्दीत सर्व उपजिल्हा रुग्णाल, ग्रामीण रुग्णालय असे एकूण 16  ठिकाणी कोव्हॅक्सीन 45 वर्षावरील लाभार्थी (दुसरा डोस) उपलब्ध आहे. ग्रामीण हद्दीत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण 67 ठिकाणी कोविशिल्ड लस 45 वर्षावरील लाभार्थी यांच्यासाठी उपलब्ध आहे.

0000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...