Tuesday, May 11, 2021

बोलेरो जीपचे जुने टायर विक्रीसाठी उपलब्ध

 वृत्त क्र. 728    

बोलेरो जीपचे जुने टायर विक्रीसाठी उपलब्ध

नांदेड (जिमाका) दि. 11 :-  नांदेड जिल्हा माहिती कार्यालयात बोलेरो एलक्स वाहन जीप क्र. एम. एच. 43 जी 434 या वाहनाचे एकुण 11 जुने टायर आहेत. हे जूने टायर आहे त्या परिस्थितीत विक्री करावयाची आहेत. यासाठी खरेदीदार व्यक्ती / दुकानदार / संस्था यांच्याकडून प्रति एक टायर खरेदी दरपत्रकाची निविदा गुरुवार 27 मे 2021 पर्यंत मागविण्यात येत आहे. इच्छुकांनी आपले लिफाफाबंद दरपत्रक जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, विसावानगर, माऊली निवास, श्री राजेंद्र मनमोहन सिंगी यांचे घर, सिध्दीविनायक मंदिराच्या बाजूला, नांदेड- 431602 या पत्त्यावर कार्यालयीन वेळेत दाखल करावेत. या संदर्भातील अटी / शर्ती कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रदर्शित करण्यात आल्या आहेत, असे जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक   461 शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशके यांची कमतरता भासू देऊ नका  : पालकमंत्री अतुल सावे                                  ...